आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला लवकरच 1 कोटी लसी मिळणार:ग्लोबल टेंडरमध्ये 7 कंपन्यांनी स्पूतनिक आणि 1 ने फायजरसाठी भरले टेंडर, निविदा भरण्याची तारीख 1 जूनपर्यंत वाढली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस पुरवठा करणाऱ्यांसोबत या चार मुद्द्यांवर होत आहे वाटाघाटी

महाराष्ट्र सरकारकडून कोरोना लसीच्या 5 कोटी डोसच्या जागतिक टेंडरला अद्यापपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही. याउलट, मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) च्या एक कोटी कोविड लसीकरता एकूण 8 पुरवठादारांनी ग्लोबल टेंडरला प्रतिसाद दिला आहे. मात्र पुन्हा एकदा निविदा भरण्याची अंतिम तारीख 1 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पहिले 25 तारखेपर्यंत निविदा दाखल करायच्या होत्या.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, लस पुरवण्याची इच्छा व्यक्त केलेल्या 8 लसी पुरवठादारांपैकी 7 जणांनी स्पुतनिक आणि एकाने फायजर व्हॅक्सीनची पूर्तता करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुंबई मनपाने 12 मे रोजी जागतिक टेंडर जारी केला होता. तेव्हा 18 मे पर्यंत 5 लस पुरवठा करणाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. या लसी पुरवठा करणार्‍यांना कायदेशीर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता मंगळवारी तीन नवीन लस पुरवठा करणाऱ्यांनी मुंबई मनपाच्या निविदेत रस दाखवला आहे.

लस पुरवठा करणाऱ्यांसोबत या चार मुद्द्यांवर होत आहे वाटाघाटी
मुंबई मनपाच्या ग्लोबल टेंडरला रिस्पॉन्स देणाऱ्या व्हॅक्सीन सप्लायरसोबत मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त मनपा आयुक्त पी. वेलरासू, उप आयुक्त संजोग कबरे आणि सहकर्मी अधिकारी कायदा प्रक्रिया करण्याचे काम करत आहेत. सर्व पुरवठादारांच्या कागदपत्रांची नीट तपासणी करुन त्यांच्याकडून व्हॅक्सीनच्या दराविषयी भाव करणे सुरू आहे.

मनपा आयुक्त चहल म्हणाले की ही लस तयार करणारी कंपनी आणि पुरवठा करण्याची इच्छा करणारी कंपनी यांच्यातील व्यावसायिक संबंधांची चौकशी केली जात आहे जेणेकरुन ही लस दिलेल्या कालावधीत पुरवली जाऊ शकेल की नाही? त्याबद्दल माहिती मिळू शकावी. यासह, किती दिवसात लसीचा पुरवठा होईल, किती लस दिल्या जातील, व्हॅक्सीनचा दर किती असेल आणि देय अटी शर्थी काय असतील? या महत्त्वाच्या बाबींचा अगदी बारकाईने आढावा घेण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...