आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:इन्स्टाग्राम मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या मुलीवर 7 जणांचा गँगरेप; अभिनेता पर्ल पुरीचा तरुणीवर अत्याचार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालवणी भागातील घटना, 6 जणांना अटक

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या १६ वर्षीय मुलीवर सात जणांनी बलात्कार केल्याची घटना मालवणी परिसरात शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून एका जणाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री १६ वर्षीय मुलगी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. पार्टी झाल्यानंतर तिच्या सात जणांनी तिच्यावर कारमध्ये आणि इतर ठिकाणी आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिला घराबाहेर सोडून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीच्या पोटात वेदना होत असल्याने आईने तिला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

असे केले अत्याचार: वाढदिवसानंतर दोघांनी तिच्यावर गाडीत अत्याचार केला. ती जागा सोडल्यानंतर पीडित मुलीला मालाड भागातील मित्राच्या घरी नेण्यात आले. तिथेही दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलगी बाहेर पडली. मात्र, पुन्हा दुसऱ्या मित्रांनी तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अभिनेता पर्ल पुरीचा तरुणीवर अत्याचार
मुंबई | एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता पर्ल पुरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मीरा-भाईंदर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. याप्रकरणी पीडित तरुणीने पाेलिसांत तक्रार दाखल केली. पर्ल याने नागीण ३, बेपनाह प्यार आणि ब्रह्मराक्षस २ या मालिकांत काम केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...