आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपाययोजना:राज्यातील 70% रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत - टोपे; पूल, रॅपिड टेस्टिंगसोबत प्लाझ्मा तंत्रज्ञानही वापरण्याचा विचार

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
पुण्यातील बिबवेवाडीमध्ये गुरुवारी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या ७० नागरिकांना पोलिसांनी अडवले आणि पोलिस ठाण्याबाहेरच  योगासने करायला लावली. तसेच हडपसर येथे घराबाहेर पडलेल्या ४८ जणांना पाेलिसांनी रस्त्यावरच याेगासने करण्यास भाग पाडले. - Divya Marathi
पुण्यातील बिबवेवाडीमध्ये गुरुवारी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या ७० नागरिकांना पोलिसांनी अडवले आणि पोलिस ठाण्याबाहेरच योगासने करायला लावली. तसेच हडपसर येथे घराबाहेर पडलेल्या ४८ जणांना पाेलिसांनी रस्त्यावरच याेगासने करण्यास भाग पाडले.
  • महाराष्ट्रामधील कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर पोहोचला सात टक्क्यांवर

राज्यातील ७० टक्के कोरोनाग्रस्तांत लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, राज्यातील रुग्णंाच्या मृत्यूची संख्या १९४ असून मृत्यूदर ७ टक्के आहे. तो कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून प्रत्येक मृत्यूचे ऑडिट केले जाईल. यासाठी डॉ. सुपे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ती मृतांचे अहवाल तपासून उपचाराबाबतची माहिती देईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रुग्णांवरील उपचारांसाठी पूल, रॅपिड टेस्टिंगसोबत प्लाझ्मा तंत्रज्ञानाचाही वापर करण्याचा विचार असल्याचे अारोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा तीन हजारांवर गेला आहे. ७०% रुग्णांत लक्षणे आढळलेली नाहीत. उपचार कसे असावेत यासाठी कृती दलाची नियुक्ती केली अाहे. देशातील एकूण तपासण्यांपैकी २०% तपासण्या आपण करत आहोत. आतापर्यंत ५१ हजार तपासण्या केल्या असून यापैकी २४ हजार तपासण्या मुंबईत झाल्या आहेत.

  • राज्यात रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा वेग २ दिवसांवरून ५.५ दिवसांवर

प्लाझ्मा तंत्रज्ञानाचा वापर करणार

राज्यात ३०० रुग्ण बरे झाले आहेत त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोनाबाधित रुग्णांना देऊन त्यांच्यातील अँटिबॉडीज वाढवण्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही आयसीएमआरकडे परवानगी मागितल्याचे टोपेंनी सांगितले.

रुग्णसंख्येचा वेग मंदावतोय

रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याचा वेग दोन दिवसांवर होता तो आता ५.५ दिवसांवर गेला आहे. पूल टेस्टिंग, रॅपिड टेस्टिंगसाठी राज्य शासनाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.

‘महारेरा’चे कामकाज 

पुणे | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉक डाऊन सुरू आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) कामकाज ३ मे पर्यंत बंद राहील,अशी माहिती महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी दिली. मात्र, प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्य यासारख्या सेवा आॅनलाइन सुरू राहणार आहेत. लॉक डाऊन संपल्यानंतर ४ मे रोजी महारेराच्या कामकाजाबाबत शासनाच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...