आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच दिवसांच्या आंदोलनानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथून माघारी फिरला आहे. माजी आमदार जे. पी. गावित आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर शनिवारी दुपारी हा निर्णय झाला. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याने लाल वादळ शमले आहे. शेतकऱ्यांना घरी जाता यावे यासाठी लांब पल्ल्याच्या ट्रेनला वाशिंद येथे थांबा देण्यात आला आहे.
शनिवारी माजी आमदार गावित आणि संबंधित अधिकारी यांची सकाळी बैठक पार झाली. यानंतर गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत.’
सरकारने घेतली धास्ती २० मार्चपर्यंत मोर्चा विधानसभेवर धडकण्याचे नियोजन आयोजकांनी केले हाेते. तर मोर्चा मुंबईत आल्यास शहर ठप्प होईल, अशी सरकारला धास्ती होती. मोर्चा नाशिकमध्येच थांबवण्याच्या दृष्टीने गावित यांच्याशी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही.
अजित नवलेंना वगळले सरकारने स्थापन केलेल्या समितीतून किसान सभेचे डॉ. अजित नवले यांना वगळण्यात आले आहे. १ जून २०१७ रोजीच्या शेतकरी संपाच्या वेळी संपात फूट पाडण्याची सरकारची खेळी डॉ. नवले यांनी उधळली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेमुळे नवले यांचे नाव समितीतून मुख्य सचिव कार्यालयाने वगळल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.