आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई:गुजरातमध्ये 3,534 कोटींचे 738 किलो ड्रग्ज जप्त

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील वडोदरातील मोकसी आणि अंकलेश्वरच्या पानोलीमध्ये 3534 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले. मोकसीमध्ये 225 व पानोली येथील कंपनीतून 513 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. याशिवाय दोन्ही ड्रग्ज कारखान्यांतून 83 किलो पावडर व 1300 लिटर लिक्विडही जप्त करण्यात आले. आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी (एएनसी) पथकाने मंगळवारी पानोली येथील ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकला. या ठिकाणी सापडलेल्या 513 किलो मेफेड्रोनची किंमत जवळपास 1026 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. हे युनिट चालवणाऱ्या गिरिराज दीक्षितला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तो रसायनशास्त्रामध्ये पदव्युत्तर आहे.

मुंबईतील चौकशीत माहिती
3 ऑगस्टला एएनसीने मुंबईतील नालासोपारा येथे 700 किलो सिंथेटिक ड्रग एमडी जप्त करत 6 जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत दीक्षितच्या कारखान्याची माहिती मिळाली. दीक्षित व त्याचा साथीदार वारंवार प्रयोग करत एमडी बनवण्यात निपुण झाले. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ड्रग्ज विकत होते. मोकसीमध्ये 225 किलो ड्रग्ज जप्त केले. येथील नेक्टर केम नावाच्या कंपनीला 13 ऑक्टोबर 2020 रोजी हायड्रॉक्सिक्लोराइड बनवण्यासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...