आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद:गणेश विसर्जनासाठी वाहतुक पोलिसांचे नियोजन, 114 ठिकाणी नो पार्किंग

मुंबई17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे नियोजन करण्यात आले आहे.

आज अनंत चतुर्दशीरोजी सकाळी 10 वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर, 114 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे.

मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान वाहने बंद पडून अथवा विसर्जनाच्या मार्गात अडथळा दुर करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून लहान व मोठया क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी केलेल्या उपाययोजना

 • एकूण ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत.
 • एकूण ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेले आहेत.
 • एकूण ५७ रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेले
 • एकूण ११४ ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आलेली आहे.

वरील वाहतुक व्यवस्था निर्बंधांचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सव शांततेने व आनंदाने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तसेच, आवश्यकतेनुसार गणेश विसर्जानवेळी आवश्यक त्या मार्गावर वरील सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. .

दक्षिण मुंबईतील हे मार्ग राहणार बंद

 • धनपाल नाका जंक्शन, कुलाबा ते पांडे जंक्शन
 • इंदू क्लिनिक कुलाबा ते बधवार पार्क जंक्शन
 • प्रिन्सेट स्ट्रीट जंक्शन ते ठाकूरद्वार जंक्शन ते चर्नीरोड जंक्शन
 • चर्नीरोड ते भाईचारा
 • विनोली चौपाटी जंक्शन ते प्रार्थना समाज, डीबी मार्ग
 • विनोली चौपाटी जंक्शन ते एन. ए. पुरंदरे जंक्शन
 • भाईचारा कंपनी ते सीपी टँक सर्कल ते माधव मार्ग ते खेतवाडी ते हनुमान मंदिर
 • सुकालही जंक्शन ते दोन टाकी जंक्शन ते दुसरा कुंभाराडा ते नागपाडा जंक्शन
 • मुंबई सेंट्रल जंक्शन ते खडा पारसी जंक्शन ते सात पारसी जंक्शन ते चिंचपोकळी जंक्शन
 • बावला कंपाऊंड ते भारतमाता जंक्शन
 • चिंचपोकळी ब्रिज ते जी. डी. अंबेकर मार्ग,भोईवाडा
 • श्रावण यशवंते चौक ते पुजारे चौक
 • गोपाळ नाईक चौकी, भायखळा ते लालबाग चौकी
 • खानोळकर जंक्शन ते सुपारी बाग जंक्शन
बातम्या आणखी आहेत...