आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:कांदिवलीत फक्त 3 दिवसांत उभारले 75 बेडचे कोविड रुग्णालय, कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारी खर्चाने नव्हे तर स्थानिक संस्थेच्या सहकार्याने बांधले रुग्णालय
  • रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक बेडसोबत ऑक्सिजन आणि इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

जागतिक महामारी कोरोनापासून बचावासाठी उत्तर मुंबईतील पश्चिम कांदिवलीतील महावीर नगर परिसरातील पावन धाम मंदिरात 75 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बेडवर ऑक्सिजन व इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. हे रुग्णालय केवळ तीन दिवसांत तयार करण्यात आले. इतकेच नाही तर हे रुग्णालय सरकारी खर्चाने नव्हे तर पोयसर जिमखाना या स्थानिक संस्थेच्या सहकार्याने बांधले गेले आहे.

या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी बुधवारी दाखल झाले. या रुग्णालयात कमी दरात लोकांवर उपचार केले जातील. खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, या रुग्णालयाच्या माध्यमातून उत्तर मुंबईतील लोकांना या कठीण काळात उत्तम उपचार मिळू शकतील. एकीकडे कोरोनामुले संपूर्ण मुंबईतील लोक दहशतीखाली आहेत. तर दुसरीकडे हे रुग्णालय लोकांची सुविधा आणि आरोग्याची काळजी घेईल. 

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन केले.
माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन केले.

यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर दीपक सावंत म्हणाले की, हे रुग्णालय कमी कालावधीत बांधले गेले हे स्वतःहून एक सुखद आश्चर्य आहे, लोकांना रुग्णालयातून सुविधा मिळतील अशी मला आशा आहे. शासनाकडून काही मदतीची गरज भासल्यास आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत.

बातम्या आणखी आहेत...