आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हतबल सरकार:कोरोना लक्षणे नसतानाही श्रीमंत रुग्ण अडवतात आयसीयूत खाटा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली

कोरोनाची लक्षणे नसतानाही श्रीमंत लोक रुग्णालयात अतिदक्षता विभागातील खाटा अडवून ठेवत आहेत, असे धक्कादायक वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केले. टाेपे यांच्या वक्तव्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभारासमोर सरकारच हतबल असल्याचे दिसून आले असून टोपेंच्या या विधानानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा धक्कादायक खुलासा केला. पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचेदेखील त्यांनी या वेळी सांगितले. पुण्यात खाटांची आणि रुग्णवाहिकांची कमतरता असणे दुर्दैवी असून जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले.

रुग्णवाहिका न मिळाल्याने एखाद्या रुग्णाला त्रास होणे हे चुकीचे आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये असा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना रुग्णवाहिका किती घ्याव्यात आणि किती घेऊ नयेत याबाबत कोणतेही बंधन घातलेले नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लागेल तेवढ्या रुग्णवाहिका घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त रुग्णवाहिका घेतल्या तरी काही हरकत नाही. मात्र रुग्णांना मोफत रुग्णवाहिका मिळाली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिल्याचे टोपे म्हणाले.

पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्यांच्या प्रयत्नातून तेथे जंबो कोविड सेंटरही बनवण्यात आले असून रुग्णांना खाटांची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. ग्रामीण भागात ८० टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार होत आहेत. मात्र, अनेक रुग्ण लक्षणे नसतानाही खाटा अडवून ठेवत असल्याचे टोपे म्हणाले. टोपे यांनी दिलेली कबुली महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे वाभाडे चव्हाट्यावर आणणारी ठरली असून कोरोना काळातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदी पुढे आली आहे.