आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभाव्य:महाराष्ट्रात 80 टक्के उद्योग पूर्ववत होणार; आज मंत्रालयात बैठकीत होऊ शकतो निर्णय 

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 29 जिल्ह्यांत उद्योग पूर्ववत करणार

लाॅकडाऊनमुळे ठप्प असलेले राज्यातील ८० टक्के उद्योग चालू हाेण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठक बोलावली असून त्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अल्प असलेल्या ग्रीन आणि आॅरेंज बेल्टमधील २९ जिल्ह्यात उद्योग पूर्ववत करण्याचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील ३ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला आहे. मात्र जनतेच्या अडीअडचणी कमी व्हाव्यात यासाठी २० एप्रिलनंतर यात काहीशी सूट दिली जाणार आहे. या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्या. केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील ८० टक्के उद्योगांना लाभ मिळेल. त्यासंदर्भात उद्याेग विभागाची गुरुवारी तातडीची बैठक होत आहे. याबाबत निर्णय झाल्यास मे किंवा जूनमध्ये उद्योग पूर्ववत होण्याची शक्यता आहे. लाॅकडाऊनमुळे उद्योग ठप्प आहेत, मालमत्ता खरेदी- विक्रीचे व्यवहार होत नाहीत, किरकोळ सामान विक्री हाेत आहे. परिणामी कर बुडाल्याने राज्याच्या तिजोरीला सुमारे ४० हजार कोटींचा फटका बसला आहे. या आर्थिक कोंडीतून सुटका करण्यासाठी ठप्प उद्योग लवकर चालू होणे राज्याच्या हिताचे आहे. तसेच सरकारी निवारा केंद्रात असलेल्या व बेरोजगार झालेल्या मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

२९ जिल्ह्यांत उद्योग पूर्ववत करणार

‘उद्योग सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार आहे. रेड झोन वगळून ग्रीन व आॅरेंज झोनमधील म्हणजे कमी संसर्गाच्या जिल्ह्यातील उद्योग चालू करणे शक्य आहे. ग्रीन झोनमध्ये १५ तर ऑरेंज झोनमध्ये १४ जिल्हे येतात. या जिल्ह्यातील उद्योग पूर्ववत करण्याचा मानस आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले. 

या असतील अटी...

  • संबंधित जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना स्थानिक उद्योगांत काम द्यावे लागेल.
  • कर्मचारी निवासाची सोय कंपन्यांनी उद्योगस्थळी करावी लागणार आहे.
  • कामगारांनी सोशल डिस्टन्स राखून काम केले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...