आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा राऊत ईडी कार्यालयातून बाहेर:पत्राचाळ घोटाळाप्रकरणी 9 तासांहून अधिक काळ चौकशी; भूखंड खरेदी, बँक खात्यातील पैशांबाबत विचारणा

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत नुकत्याच ईडी कार्यालयातून बाहेर आल्या आहेत. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांची तब्बल 9 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. सकाळी 11 वाजेपासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती.

ईडी कार्यालयातून बाहेर पडताच वर्षा राऊत आणि संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी सांगितले, ईडीच्या सर्व प्रश्नांना वर्षा राऊत यांनी उत्तरे दिली. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहू.

ईडीला हवे या प्रश्नांचे उत्तर

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आतापर्यंत मिळालेले पुरावे तसेच कोठडीत असलेल्या संजय राऊत यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग प्लॉटच्या खरेदीबाबतही ईडीने वर्षा राऊत यांच्याकडून माहिती जाणून घेतली. पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून अलिबागमधील भूखंड खरेदी केल्याचा ईडीला संशय आहे. तसेच, वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात असलेले 1 कोटी रुपये नेमके कुठून आले, याबाबतही ईडीला माहिती हवी आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून 55 लाख रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाले, या व्यवहाराबाबतही ईडी वर्षा राऊत यांची चोकशी करत आहे.

राऊतांना अनोळखी व्यक्तींकडून पैसे

गोरेगावमधील पत्राचाळप्रकरणी चौकशीशाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते. दरम्यान, अलिबाग येथे वर्षा राऊत यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे काही कागदपत्रे ईडीने कोर्टात सादर केली आहेत. राऊत यांच्या नावावर काही अनोळखी लोकांची पैसे पाठवल्याचा दावा देखील ईडीने केला आहे. त्यानुसार आता याप्रकरणी पैशांच्या व्यवहाराची देखील चौकशी होणार आहे. ईडीने वर्षा राऊत यांची याआधीही पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी केली होती.

बातम्या आणखी आहेत...