आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकमी होत चाललेली जंगले, जंगलांमधील वाढता मानवी हस्तक्षेप, वन्यप्राण्यांचे खंडित झालेले भ्रमणमार्ग यामुळे वन्यजीव आणि मानवामधील संघर्ष राज्यात वाढत प्रचंड वाढत आहे. राज्यामध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मागील ९ महिन्यांत तब्बल ९३ नागरिकांचा, तर २१ हजार २५३ जनावरांचा मृत्यू ओढवला आहे. वनप्राण्यांच्या हल्ल्यात यंदा गेल्या ५ वर्षातील सर्वाधिक मानव मृत्यू ओढवले आहेत. जंगलामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचे भक्ष्य कमी होत चालल्याने आदिवासी पाड्यांमधील रहिवाशांवर बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात ३७, गडचिरोलीत २५ नागरिकांचा गेल्या ९ महिन्यांत वन्यप्राण्याकरवी बळी घेतला गेला आहे. मानव, पशुधन तसेच पिकांच्या नुकसानीपोटी वन विभागाकडून एप्रिलपासून डिसेंबरअखेरपर्यंत ६५ कोटी ३१ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, वन्यप्राणी व मानव संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्रालगत असलेल्या गावांना कुंपण घालण्याचा वन विभागाचा प्रस्ताव आहे. गावाभोवती खंदक, वनस्पतींचे जैव कुंपण, वीज कुंपण, बांबू वनाचे कुंपण घालण्याची योजना आहे. तसेच शेतीच्या कुंपणासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. तो लवकरच सादर करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.