आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:मुद्रांक शुल्काचे सहामाही संकलन 948.47 अब्ज

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवान आर्थिक घडामोडींचा परिणाम महसूल संकलनावर स्पष्टपणे दिसत आहे. वित्त वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून महसूल संकलन वाढून ९४,८००.४७ कोटी रुपये झाले आहे. हे गेल्या वर्षी या अवधीपेक्षा ३५ टक्के जास्त आहे. गेल्या वित्त वर्षात हे ७०,१००.२० कोटी रु. होते. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि २७ राज्यांच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

सोमवारी जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, गेल्या वित्त वर्षात पहिल्या सहामाहीदरम्यान मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काचे सरासरी मासिक संकलन ११६.८७ अब्ज रु. होते. हे या वर्षी १५८.०७ अब्ज झाले आहे. या वर्षी पहिल्या सहामाहीत १८६ अब्ज रुपयांच्या संकलनासह महाराष्ट्र अव्वल तर उत्तर प्रदेश १२३.९४ अब्ज रु.सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू- ८६.६२ अब्ज कर्नाटक- ८२.२९ अब्ज, तेलंगण- ७२.१३ अब्ज रुपये संकलन झाले.

बातम्या आणखी आहेत...