आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 9615 नवे रुग्ण, 278 मृत्यू; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.99 टक्के

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 637 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

राज्यात शुक्रवारी दिवसभरात ९ हजार ६१५ रुग्णांची भर पडली असून २७८ मृत्यूंची नोंद झाली. तर ५७१४ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण १ लाख ९९ हजार ९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के इतके झाले आहे.

मराठवाड्यात 637 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू
औरंगाबाद / मराठवाड्यात शुक्रवारी एकूण ६३७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून दहा बाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून ३२४ नवे रुग्ण आढळले तर ६ मृत्यूंची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात नवीन ७६ रुग्ण सापडले. नांदेड जिल्ह्यात ३९ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला. तर जालना जिल्ह्यात तब्बल ११७ नवे रुग्ण आढळले आहेत. हिंगोलीत २४ नवे रुग्ण आणि एक बळी, परभणीत २३ नवीन रुग्ण आणि दोन बळी तर बीडमध्ये १६ रुग्णांची वाढ झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही १८ नवीन रुग्ण आढळून आले.