आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेन प्रकल्प:बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात 98% जमिनीचे अधिग्रहण, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने होत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने सोमवारी केला. मंत्रालयानुसार, या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात ९८ टक्क्यांहून अधिक जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ११८ किमीपेक्षा जास्त अंतरासाठी खांब रोवण्यात आले आहेत. गर्डर्स लावले असून बुलेट ट्रेन स्थानकांच्या निर्मितीचे कामही सुरू झाले आहे.

महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर वन विभागाची परवानगी व जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबाबत मंत्रालयाने सविस्तर ट्वीट केले आहे. त्यानुसार, गुजरातमध्ये ९८.८७ टक्के आणि दादरा व नगर हवेलीत १०० टक्के जमीन अधिग्रहित केली आहे. रेल्वे मंत्रालयानुसार, गुजरातमध्ये ३० टक्के आणि महाराष्ट्रात १३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किलोमीटरचा असून याचा बहुतांश भाग गुजरातमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...