आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:9 वी अन् 11वीचे विद्यार्थीही परीक्षेविना जाणार पुढच्या वर्गात : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात वाढत्या चाललेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ९ वी आणि ११ वी या दोन इयत्तांच्या परीक्षा न घेण्यावर शिक्षण विभागात एकवाक्यता असून या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी दिले.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बुधवारी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. इयत्ता १ ते ८ वीच्या यंदाच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तोच प्रकार आता ९, ११ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी अवलंबला जाणार आहे. मात्र अद्याप निर्णय जाहीर झाला नसून मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर तो जाहीर केला जाईल. २३ एप्रिल रोजी १२ वीच्या तर १० वीच्या परीक्षा २९ एप्रिल रोजी सुरू होत आहेत. मात्र याचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे.

बातम्या आणखी आहेत...