आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्ट अपघात:25 मजली इमारतीतील लिफ्ट तुटून एका 20 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील विक्रोळी येथे बुधवारी दुपारी २५ मजली इमारतीत लिफ्ट कोसळून एका २० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. पूर्व मुंबई उपनगरातील स्टेशन रोडवरील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. त्या वेळी काचेच्या केबिन असलेल्या लिफ्टमध्ये चार प्रवासी होते.

लिफ्ट काेसळल्यानंतर ते तळमजल्यावरील लिफ्ट कारमध्ये अडकले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून लिफ्टचा दरवाजा उघडला. यातील चाैघांपैकी एक जण गंभीर जखमी झाला हाेता. त्यास राजवाडी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...