आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रायगड दुर्घटना:देव तारी त्याला कोण मारी! 19 तासांनंतर 4 वर्षांच्या चिमुरड्याला ढिगाऱ्याखालून सुखरुप काढले बाहेर

रायगड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देव तारी त्याला कोण मारी! असे म्हणतात. या म्हणीचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आला आहे. येथे एक भीषण इमारत दुर्घटना घडली. 5 मजली इमारत सोमवारी रात्री कोसळली. येथे रात्रीपासून बचाव कार्य अजुनही सुरू आहे. दरम्यान आता तब्बल 19 तासांनंतर ढिगाऱ्याखालून एका 4 वर्षीय बालकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

या इमारतीमध्ये 41 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. दरम्यान त्यातील 60 जणांना बाहेर काढलं आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 17 लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ओफ्रेशन रात्रीपासून सुरू आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

0