आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखिकेवर बलात्कार आणि D गँग कनेक्शन:व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल, पीडिता म्हणाली - दाऊदच्या गुंडानी धमकावले

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका 75 वर्षीय व्यावसायिकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला लेखिका आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिचे म्हणणे आहे.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, बलात्कारानंतर आरोपीने तिला गप्प राहण्याची धमकी दिली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी आपले संबंध असून बलात्काराबाबत कोणाला सांगितले तर ठार मारले जाईल, अशी धमकी आरोपीने दिली होती.

व्यावसायिकाने महिलेकडून 2 कोटींचे कर्ज घेतले
पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला डी कंपनीतील कोणीतरी फोन करुन व्यावसायिकाविरुद्ध तक्रार करु नये असे सांगितले. तसेच आरोपीने आपल्याकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते परत केले नाही. त्यावर पीडितीने आवाज उठवल्यावर तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबद्दल कुठेही वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी दिली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो आता एमआयसीडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. डी कनेक्शन दृष्टीकोनातून पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...