आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालयाच्या परवानगीसाठी 1 लाखांची लाच घेतली:मुंबई पालिकेचा अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, गुन्हा दाखल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शौचालयाच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेच्या दुय्यम दर्जाच्या अभियंत्याने 1 लाखांची लाच घेतल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

भुषण लक्ष्मण भुमाणे (वय ४५ वर्षे) असे या दुय्यम अभियंत्याचे नाव असून तो सहायक आयुक्त (बजार) यांचे कार्यालय, बृहन्मुंबई महापालिका, महात्मा ज्योतिबा फुले (क्रॉफर्ड माक्रेट) येथे कार्यरत आहे.

पालिकेकडून परवानगी रद्द

कारवाईबाबत लाचलुचपत विभागाने माहिती दिली की, तक्रारदार हे कुंधडिया सेवा संघ या संस्थेचे खजिनदार आहेत. भुलेश्वर म्युनिसिपल मंडईतील शौचालयाच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र, या शौचालयाची परवानगी रद्द करण्याकरिता महापालिकेच्या कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली होती. नोटीसविरोधात तक्रारदाराने न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. ​​

वर्क ऑर्डरसाठी लाच मागितली

तक्रारदार यांच्या संस्थेच्या नावे असलेला परवाना नुतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांना वर्क ऑर्डरची कॉपी देण्यासाठी भुषण भुमा यांनी 4 लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. तडजोडीअंती तक्रारदाराकडून 3 लाखांची लाच स्विकारण्याची तयारी आरोपीने दर्शविली. त्यानुसार सापळा रचून भुषण भुसाणे यांना 1 लाखांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...