आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी बातमी:रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली गाडी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील 'अँटिलिया' या त्यांच्या निवासस्थानाजवळ ही गाडी आढळली असून, मुंबई पोलिस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी यांच्या घराबाहेर असलेल्या गाडीत जिलेटिनच्या कांड्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

तपास क्राइम ब्रांचकडे

याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, 'मला या प्रकरणाची माहिती आताच मिळाली आहे. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखा करत आहे. लवकरच सत्य समोर येईल.'

अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू

राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, ' अंबानी यांच्या घरासमोरील वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा लवकर छडा लावू. पण तपास सुरु असल्याने सध्या काही भाष्य करणे चुकीचे ठरेल. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचे कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल.'

बातम्या आणखी आहेत...