आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:मराठीचा वापर न करणाऱ्या अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखणार, या संदर्भातील परिपत्रक जारी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर सातत्याने कमी होत असल्याच्या तक्रारी

राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर न केल्यास किंवा तसे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पगारवाढ वर्षभरासाठी रोखण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आघाडी शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. मंत्रालयासोबतच सरकारची सर्व विभागीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व कामकाज व पत्रव्यवहार मराठीतूनच व्हावेत. योग्य कारण असले तरच या नियमाला अपवाद केला जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.

मराठी भाषेचा वापर न करणाऱ्याला कर्मचाऱ्याला वा अधिकाऱ्याला सुरुवातीला इशारा दिला जाईल किंवा त्याच्याबद्दलच्या गोपनीय अहवालात याबद्दल नोंद केली जाईल किंवा एक वर्षासाठी त्याची पगारवाढ थांबवली जाईल, असे पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर सातत्याने कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

0