आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरातून येत असलेल्या बलात्काराच्या घटनांदरम्यान महाराष्ट्रातील पालघर येथे एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पालघरच्या मोखाडा भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपी एक कंत्राटदार आहे.
आरोपीनुसार, पीडितेच्या घरात कुणी नसल्याचे पाहत आरोपी तळीवाडी येथील तिच्या घरात घुसला होता. यानंतर तिला एकटीला पाहून आरोपीने अत्याचार केले. कुटुंबाच्या तक्रारीनंतर आरोपींना अटक करण्यात आली.
पीडितेच्या भावाने आरोपीला रंगेहात पकडले
मोखाडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, 'पीडितेच्या भावाने आरोपीला रंगेहात पकडले. त्याने गोंधळ करायला सुरुवात केली तेव्हा आरोपीने पळ काढला. दरम्यान कुटुंबाच्या तक्रारीनंतर आरोपीला शुक्रवारी अरेस्ट करण्यात आले आहे' ही घटना 8 सप्टेंबरच्या रात्रीची आहे. पीडिता आणि तिचे कुटुंब कंस्ट्रक्शन साइटवर काम करते. आरोपी नितिन महादु पाटील (वय 34) साइटचा ठेकेदार होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.