आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय:ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची विधानसभा अध्यक्षांशी भेट

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गुरुवारी (ता.२५) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने नार्वेकर यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात भेट घेतली सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण विधानसभा अध्यक्षांना सोपवले आहे त्याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी खात्री असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेटीनंतर दिली.