आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:एका व्यक्तीने दारूच्या नशेत दांड्याने मारत आई, भावाचा केला खून, पोलिसांत गुन्हा दाखल

रायगड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात बापर्डे बौद्धवाडी येथील एका व्यक्तीने दारूच्या नशेत आई व भावाचा दांड्याने मारहाण करून खून केला. शोभा मुरारी सकपाळ (७५) व मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ (५५) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. भारत मुरारी सकपाळ (५०) याच्यावर देवगड पोलिसांत गुन्हा दाखल केला.

माहितीनुसार, भारतला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेतच त्याचे आई व भावासोबत रात्री वाद झाला होता. त्यानंतर आई व भाऊ झोपलेले असताना मध्यरात्री भारतने दोघांच्या डोक्यात दांड्याने मारहाण करत खून केला. लवकर उठणाऱ्या शोभा उशिरापर्यंत घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून आत डोकावले असता मृतदेह दिसले.

बातम्या आणखी आहेत...