आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:ठाण्यामध्ये एका रासायनिक कारखान्यात भीषण आग, घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खबरदारीचा उपाय म्हणून आज आजुबाजूच्या फॅक्टरी बंद करण्यात आल्या आहेत.

ठाण्याच्या अंबरनाथच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात असलेल्या रासायनिक कारखान्यात भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. कारखान्यात असलेल्या एका बायलरमध्ये ही आग लागली आणि थोड्याच वेळात संपूर्ण कारखान्यात आग पसरली आहे. मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येत आहे.

अंबरनाथवरील विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ही आग लेव्हल 2 ची आहे. आग विझवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. पहाटेच्या वेळी कारखान्यात मोजकेच लोक होते. सर्वांना वेळीच बाहेर काढले गेले आहे. कारखान्यातील केमिकलमुळे त्यातून निघणारा काळा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आज आजुबाजूच्या फॅक्टरी बंद करण्यात आल्या आहेत.

घटनास्थळी 3 फायर इंजन आणि 2 वॉटर टँकर उपस्थित आहेत आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कारखान्यातून निघणारा काळा धूर आजुबाजूच्या परिसरात पसरला आहे.

बातम्या आणखी आहेत...