आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरमधील कारखान्यात भीषण स्फोट:तारापूर एमआयडीसीतील कापड कारखान्यात बॉयलरचा स्फोट, एक कामगार ठार आणि 4 जखमी

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फॅक्ट्रीत अनेक जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये एक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ही घटना एमआयडीसीतील कापडाची निर्मिती करणाऱ्या जाखरीया लिमिटेड कंपनीमध्ये घडली आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेत जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लॉट जे -1 मध्ये असलेल्या या कंपनीला सकाळी 6 च्या सुमारास आग लागली. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, त्याचा आवाज सुमारे 4 ते 5 किलोमीटर ऐकू आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे.

भारत केमिकल्स कारखान्यात मोठा स्फोट
राज्यात अनेक दिवसांपासून आगीच्या घटना घडत आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्समध्ये स्फोट झाला होता. यामध्ये पाच कामगार जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...