आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल:एक बेडूक आणि त्याची दोन पोरं; बेडूक आणि त्याची पिल्ले वाघ पाहून ओरडत सुटलेत, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्ला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत असतात. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी तुलना केली आहे.

पुढे ठाकरे म्हणाले की, 'काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडूक आहेत. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे एक बेडूक आणि त्याची दोन पोरे. या पक्षातून त्या पक्षात. बेडकाच्या पिल्लाने बैल पाहिला असे मी लहान असताना गोष्ट ऐकली होती. पण आता बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला आणि ते पळत सुटले. त्यांनी बाबांना सांगितले. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही' अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांडे पालन करून हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळीचा सोहळा स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला आहे.