आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मराठा आरक्षणावर 5 सदस्यीय घटनापीठापुढे बुधवारी सुनावणी होणार, मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले आहे. ९ डिसेंबर रोजी पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापण्यासाठी राज्य सरकारने २० सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानंतरही चार अर्ज करण्यात आले.

सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबरला दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. अद्याप यासंदर्भात निर्णय झालेला नव्हता. अखेर राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून गुरुवारी यावर सुनवाणी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser