आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळली, 3 मजुरांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित काढले बाहेर; कोट्यावधींचे नुकसान

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भिवंडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचली आहे आणि गर्दी नियंत्रित करण्याचे काम करत आहे
  • कारखान्यात केक बनवण्याचे 12 टनचे ओव्हन होते, या सर्वांचे नुकसान झाल्याची माहिती आहे

भिवंडी तालुक्याच्या श्रीराम कंपाउंडमध्ये मोंजिंनियस केक फॅक्ट्रीची दोन मजली इमारत शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त झाली. या फॅक्ट्रीमध्ये मुंबई आणि उपनगरीय परिसरासाठी केक आणि बेकरी प्रोडक्ट्स बनवले जात होते. या इमारतीची अवस्था खूप वाईट होती असे वृत्त आहे.

सर्वात पहिले वरचा मजला पडला आणि त्याच्या वजनाने थोड्याच वेळात खालचा मजलाही कोसळला. ज्यावेळी ही दुर्घटना झाली तेव्हा फॅक्ट्रीमध्ये केवळ तीन लोक होते. तिघांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. भिवंडी फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहे. भिवंडी पोलिसांची तुकडीही घटनास्थळी पोहोचली आहे.

कोट्यावधींचे झाले नुकसान
फॅक्ट्रीकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यामध्ये दोन टनचे 12 केक ओव्हन लावण्यात आलेले होते. या सर्वांचे नुकसान झाले आहे. तसेच या अपघाता अनेक कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.