आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील प्रवाशाचा अविस्मरणीय प्रवास:360 लोकांची क्षमता असणाऱ्या विमानात एकटा बसून दुबईत गेला तरुण, केवळ 18 हजार रूपयांमध्ये खरेदी केले होते तिकीट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईहून दुबईच्या फ्लाइटच्या इंधनाचा खर्च 8 लाख रुपये

मुंबईत राहणाऱ्या भावेश जावेरी यांचा 19 मे रोजीचा दुबईपर्यंतचा विमान प्रवास अविस्मरणीय ठरला आहे. ते बोइंग 777 प्लेनने 18 हजार रुपयांत तिकीट बुक करुन दुबईत गेले होते. या दरम्यान 360 सीटच्या संपूर्ण प्लेनमध्ये एकटे आहेत. त्यांच्यासाठी हा अनुभव कोणत्याही चार्टड फ्लाइटपेक्षा कमी नव्हते. त्यांनी एंट्री करताच एअर होस्टेजेज आणि कॅप्टनने त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

40 वर्षांचे भावेश जावेरी स्टारजेम्स ग्रुपचे CEO आहेत. दुबईमध्येही त्यांच्या कंपनीचे ऑफिस आहे. ते अनेक वेळा फ्लाइंट्सने मुंबईहून दुबईला गेले आहेत. मात्र यावेळचा प्रवास त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. भावेश यांनी सांगितले की, कामासाठी त्यांनी एअरलाइन्स एमिरेट्सला कॉल करुन एक आठवड्यापूर्वी दुबईचे तिकीट बुक केले होते. याची किंमत 18 हजार रुपये होती.

जावेरी यांनी सांगितले की, ते सामान्यतः बिझनेस क्लासमध्ये जातात. मात्र यावेळी त्यांनी इकॉनॉमी क्लासचे तिकीट घेतले होते. त्यांच्या फ्लाइटची वेळ 4:30 होती. ते फ्लाइटमध्ये बसले तेव्हा हे पाहून चकीत झाले की, विमानात क्रू मेंबर आणि त्यांच्याशिवाय कोणताच प्रवासी नव्हता.

मुंबईहून दुबईच्या फ्लाइटच्या इंधनाचा खर्च 8 लाख रुपये
या अडीच तासांच्या फ्लाइटसाठी बोइंग 777 विमानात 8 लाखांचे इंधन लागते. अशा वेळी केवळ एका प्रवासाला घेऊन मुंबईहून दुबईला जाण्याचा एमिरेट्सचा निर्णय हा हटके होता. एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, असे तेव्हाच शक्य होते जेव्हा विमान जास्ती जास्त प्रवाशांना घेऊन दुबईहून मुंबईत आले असेल आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुबईत परतायचे असेल.

अशा वेळी एअरलाइन्सने त्याच फ्लाइटमध्ये भावेश यांना तिकीट दिले असेल. तसा मुंबईहून दुबई रुटवर एका चार्टर्ड फ्लाइटचे भाडे 70 लाख रुपये असते.

बातम्या आणखी आहेत...