आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कृषी विधेयकाला विरोध:शेतकरी संघटनांकडून शुक्रवारी देशव्यापी बंद, मंजूर कृषी विधेयकाच्या विरोधात 208 संघटनांची हाक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल रोको आणि इतरही प्रकारे आंदोलन केले जाणार

मोदी सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात किसान संघर्ष समितीने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. २५ सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी पुकारलेला बंद यशस्वी करा, असे आवाहन विराेधी पक्षांना केले आहे.

विरोधकांचा विरोध डावलून तीन कृषी विधेयके संसदेत मंजूर करण्यात आली आहेत. यावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. किसान संघर्ष समन्वय समितीअंतर्गत २०८ संघटनांनी केंद्राच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. माकपचे काॅ. अशोक ढवळे म्हणाले, भाजप सरकार दावा करत आहे की, शेतमाल एमएसपी खरेदी केला जाईल. परंतु विधेयकांमध्ये अधिक हमीभाव देण्याचा उल्लेख नाही.

रेल रोको, रास्ता रोको करणार

२५ सप्टेंबर २०२० रोजीच्या देशव्यापी बंद आवाहनाला माकपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय किसान सभेने पाठिंबा दिला आहे. या दिवशी रास्ता रोको, रेल रोको आणि इतरही प्रकारे आंदोलन केले जाणार आहे, असे महाराष्ट्र किसान सभेचे डाॅ. अजित नवले यांनी सांगितले.