आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • A Nurse Administered Anti Rabies Injection To A Person Who Arrived In Thane To Get The Corona Vaccine, A Doctor And A Nurse Were Suspended

निष्काळजीपणा:ठाण्यात एका व्यक्तीला कोविड व्हॅक्सीनऐवजी दिले अँटी रॅबीजचे इंजेक्शन, एका डॉक्टरसह परिचारिका निलंबित

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चुकीच्या रांगेत उभे राहिल्याने झाले कंफ्यूजन

कोरोना संसर्गाच्या धोक्यात डॉक्टर आणि परिचारिकांचा निष्काळजीपणा देखील समोर येत आहे. ताजे प्रकरण ठाण्यातून समोर आले आहे. मंगळवारी येथे लसीकरण मोहिमेदरम्यान, एका परिचारिकेने एका व्यक्तीला अँटी रेबीज (कुत्रा चावण्याचे इंजेक्शन) चे इंजेक्शन दिले. मात्र, याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार आरोपी नर्स आणि या ड्राइव्हचे इंचार्ज डॉक्टर यांना निलंबित करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले की, ही घटना ठाण्यातील कळवा परिसरातील आरोग्य केंद्रातील आहे. आम्ही नर्स आणि डॉक्टरांना निलंबित केले आहे ज्यांनी अँटी रेबीज इंजेक्शन दिले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि ज्याला लसीकरण केले गेले आहे त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहे.

चुकीच्या रांगेत उभे राहिल्याने झाले कंफ्यूजन
संदीप माळवी यांनी सांगितले की, राजकुमार यादव हे आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचा डोस घेण्यासाठी आले होते, परंतु चुकून तो अँटी रेबीज इंजेक्शन दिले जाते त्या रांगेत उभा राहिला. त्याचवेळी आरोग्य केंद्राच्या परिचारिका कीर्ती पोपरे यांनी राजकुमार यादव यांच्या केस पेपरकडे न पाहता इंजेक्शन दिले. संदीप पुढे म्हणाले की लस देण्यापूर्वी रुग्णाच्या केस पेपरची तपासणी करणे हे परिचारिकेचे कर्तव्य होते.

असा निष्काळजीपणा यूपीमध्येही आला होता समोर
उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये देखील गेल्या मार्चमध्ये असाच निष्काळजीपणा समोर आला होता. येथे 3 महिलांना कोरोना ऐवजी रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले. यापैकी 70 वर्षीय महिलेची प्रकृती खालावली तेव्हा ही बाब उघडकीस आली. तिन्ही महिलांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते.

बातम्या आणखी आहेत...