आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक:राज्यामध्ये 74% मतदानाचा प्राथमिक अंदाज, 7,135 ग्रा. पं. : 20 डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात रविवारी ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ६७ टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्त भागामध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि त्याच दिवशी निकालही लागणार आहे.

लिंबागणेश : ईव्हीएमवर स्टफबाँड टाकून सरपंचपदाचे बटण लॉक
बीड | बीड तालुक्यातील लिंबागणेशमध्ये चक्क ईव्हीएम मशीनवर स्टफबाँड हे डिजिटल बॅनर चिकटवण्याचे द्रव टाकून सरपंचपदाच्या उमदेवाराचे बटणच लॉक करण्यात आल्याचा प्रकार घडला. यामुळे काही काळ गोंधळ उडाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर दुसरे मशीन लावून मतदान सुरू झाले.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या जिल्हासंख्या ग्रा.पं.ची जिल्हानिहाय संख्या
ठाणे 35
पालघर 62
रायगड 191
रत्नागिरी 163
सिंधुदुर्ग 291
नाशिक 188
धुळे 118
जळगाव 122
अ.नगर 195
नंदुरबार 117
पुणे 176
सोलापूर 177
सातारा 259
सांगली 416
कोल्हापूर 429
औरंगाबाद 208
बीड 671
नांदेड 160
उस्मानाबाद 165
परभणी 119
जालना 254
लातूर 338
हिंगोली 61
अमरावती 252
अकोला 265
यवतमाळ 93
बुलडाणा 261
वाशीम 280
नागपूर 234
वर्धा 111
चंद्रपूर 58
भंडारा 304
गोंदिया 345
गडचिरोली 25

एकूण : 7,135

बातम्या आणखी आहेत...