आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार जितेंद्र आव्हाड म्‍हणाले:रॅपर्सना एकत्र करून ठाण्यात करणार कार्यक्रम

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘चोर आले पन्नास खोके घेऊन’ हे रॅप गाणे गाणाऱ्या राज मुंगसे याच्या अटकेवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या भाषेत व्यक्त होणे हे बाबासाहेबांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. सर्व रॅपर्सना एकत्र करून ठाण्यात कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.उमेश खाडे आणि राज मुंगसे यांना पोलिसांनी तुरुंगात टाकले. संविधान पायदळी तुडवले. छत्रपती संभाजीनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी राज मुंगसे याचे ‘पन्नास खोके’ रॅप साँग खूप व्हायरल झाले आहे. हे गाणे ५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आणि ऐकले आहे. एकूणच या प्रकरणावरून राजकारण होत आहे.