आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवरायांना अडवण्यासाठी बाप लेकांत भांडणे लावण्यात आली होती, असे सूचक वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर शिवराज्यअभिषेक सोहळ्यावेळी केले. राज्यसभेला अपक्ष पाठिंबा न दिल्याच्या प्रकरणावरून संभाजीराजे शिवसेनेवर नाराज असल्याचे यावरून दिसून आले. प्रस्थापित स्वराज्याला सुरुंग लावणार हे त्यावेळीच शिवाजी महाराजांना कळाले होते, असे म्हणत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
संभाजीराजे काय म्हणाले?
संभाजीराजे म्हणाले की, शहाजी राजांना सांगण्याते आले होते की, मुलाला घरातच थांबवा, नाहीतर आमच्यात सामील करून घ्या, असे म्हणत त्यांनी शिवसेना प्रवेशाच्या मुद्द्याला अप्रत्यक्ष हात घातला. ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजाच्या विरोधात अनेक बादशाही होत्या. कुतुबशाही, मोघलशाही आदिलशाही या सर्वांना लक्षात आले होते की, शिवाजी महाराज हे वेगळे रूप आहे. हे काही तरी वेगळे घडवणार आहेत. आताच शिवाजी महाराजांना रोखायला हवे, असे त्या वेळच्या आदिलशाही आणि मोगलशाह्यांना वाटले. यावेळी त्यांनी ठरवले की बाप लेकांत भांडण लावायचे. त्यावेळी शहाजीराजेंवर खूप दबाव टाकला, कारण शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करणार होते. स्वराज्य स्थापन करणाऱ्यांच्या घरातही फूट पाडायची, असा टोला त्यांनी राज्यसभा निवडणुकीवरून लगावला. राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस प्रस्थापित लोक घराण्यात फूट पाडण्यापर्यंत गेले होते, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
अशी केली तुलना
राज्यसभेला संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने अपक्ष पाठिंबा दिला नाही. त्यानंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यावर संभाजीराजेंचे वडील शाहू महाराजांनीही भूमिका स्पष्ट केली आणि संभाजीराजेंच्या उमेदवारीचा आणि छत्रपती घराण्याचा संबंध नाही म्हणत तो त्यांचा वयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले. यावर आता संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली आहे. आणि घरात फुट पाडणे आणि दबाव आणणे हे इतिहासात ही झाले आहे. स्वराज्य उभे करताना बाप - लेकांत भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते राऊत?
संभाजीराजे यांना पुढे करून भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी एक डाव रचला होता, एक कपट रचले गेले होते. शाहू महारांजानी सत्य बोलून हे कपट उधळवून लावले आणि सत्य काय आहे ते जनतेसमोर आणले. छत्रपती घराणे आणि शिवसेना यांच्यात काही मतभेद नाहीत, हे शाहू महाराजांच्या वक्तव्यामुळे सिद्ध झाले असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. आता संभाजीराजेंच्या या वक्तव्यावर कोण काय प्रतिक्रिया देणार हे पााहावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.