आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजबाबदारपणा:मुंबईच्या सरकारी रुग्णालयाच्या ICU मध्ये अ‍ॅडमिट रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले, बीएमसीने दिले पावसाचे कारण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चारवर्षांपूर्वी आले होते असेच प्रकरण

संक्रमण काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील (BMC)अतिशय भयावह चित्रे समोर आले आहे. येथे आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर पडलेल्या पेशंटचा डोळा उंदराने कुरतडला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीच्या आदेशासह कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच त्या असेही म्हणाल्या की, पावसामुळे उंदीर दरवाजाच्या गॅपमधून आत प्रवेश करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच रूग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातही गोंधळ घातला. कुर्ला येथील कामणी भागातील रहिवासी श्रीनिवास यल्लाप्पा (वय 24) यांना रविवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या डोक्यात ताप गेला आणि मूत्रपिंडातही वेदना होत होती. हे पाहता श्रीनिवास यांना आयसीयूमध्ये दाखल केले.

नातेवाईकांना असे कळाले
मंगळवारी सकाळी श्रीनिवासच्या नातेवाईकांनी त्याच्या एका डोळ्यातून रक्तस्त्राव झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने रुग्णालय प्रशासनाला त्याविषयी माहिती दिली. डोळ्याची तपासणी केली असता, उंदराने डोळा कुरतडला असल्याचे समोर आले.

उंतराने कुरतडूनही वाचला रुग्णाचा जीव
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर कळाले की, डोळा वाचला आहे. उंदराने डोळ्याच्या पापणीखाली कुरतडले. डोळ्यांमध्ये कोणतीही ईजा झालेली नाही.

उंदीर मिळण्याबाबत बीएमसीचा तर्क
या घटनेवर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, रुग्णालयाचा आयसीयू विभाग तळमजल्यावर असूनही रुग्णालय सर्व बाजूंनी बंद आहे. पावसामुळे उंदीर दाराच्या फटीतून आत आला असावा, परंतु अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही नक्कीच उपाय करू. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.

चारवर्षांपूर्वी आले होते असेच प्रकरण
अशीच एक घटना चार वर्षांपूर्वी कांदिवली परिसरातील शताब्दी रूग्णालयात उघडकीस आली होती. येथेसुद्धा कोमामध्ये असलेल्या रुग्णाचे डोळे उंदीरांनी कुरतडले होते.

बातम्या आणखी आहेत...