आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद:राज्यात 24 तासांत विक्रमी 926 रुग्ण कोरोनातून मुक्त, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • 2 लाख 21,645 चाचण्यांपैकी 1 लाख 95,804 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

मंगळवारी २४ तासांत राज्यभरात ९२६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. आठवडाभरापासून रुग्णसंख्येत दररोज हजारापेक्षा जास्तची भर पडत असताना मंगळवारी कोरोनामुक्तांतही वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ५,१२५ झाली आहे. सोमवारी ५८७  व मंगळवारी ३३९ असे एकूण ९२६ रुग्ण बरे झाले.  
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सोमवारी एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाइकांनाही दिलासा मिळाला आहे. सोमवारी रुग्णांना घरी सोडण्यात आले. मंगळवारी  त्यात ३३९ जणांची भर पडली. आरोग्यमंत्र्यांनी उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच रुग्णांच्या नातेवाइकांचे अभिनंदन केले. समाजात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना रुग्ण बरे होत आहेत ही सकारात्मक बाब पुढे येत असल्याने भीतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. आठवडाभरानंतर चांगली बातमी लक्षणीय बाब म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडले होते आणि बरोबर एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा विक्रमी संख्येत रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...