आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना:दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण, स्वत: ट्विट करत दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. काल फडणवीस लातूरला होते त्यांनी सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईला परतले होते. फडणवीसांनी स्वत: ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

शुक्रवारी फडणवीस लातूर दौऱ्यावर होते त्याठिकाणाहून ते सोलापुरला देखील जाणार होते. मात्र त्यांना ताप आल्यानंतर त्यांनी तो दौरा करुन मुंबईकडे परतले होते. त्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर होम आयसोलेशमध्ये उपचार सुरू आहे. यापुर्वी दुसऱ्या लाटेत देखील फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत.

बैठक रद्द

आज संध्याकाळी राज्यसभेसंदर्भातली बैठक देखील पार पडणार होती. मात्र, त्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार नाहीत.

लवकर बरे व्हा

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कोरोनातून लवकर बरे व्हा" असे राऊतांनी म्हटले आहे.

मविआच्या नेत्यांनी भेट

दोन दिवसांपुर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यसभेबाबत फडणवीस यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.

10 जूनला मतदान

राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार असून, त्याआधी फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते गृहविलगीकरणात असले तरी, राज्यसभेच्या निवडणुकीला ते उपस्थित राहणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...