आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपविरोधात व कृषी कायद्यांविरोधात लढण्यासाठी अकाली दलाने शिवसेनेची मदत घेत आहेत.

शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेतली आहे. यावेळी ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

ही भेट घेतल्यानंतर अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले आहे की, 'शेतकरी आंदोलनातील सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असणार आहे. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीमध्येही ते हजेरी लावतील. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे'

काही दिवसांपूर्वीच शेतकरी विधेयक पारीत झाल्याच्या विरोधात शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले होते. तर शिवसेना एक वर्षापूर्वीच एनडीएमधून बाहेर पडली आहे. शिवसेने पाठोपाठ अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्यानंतर भाजपला धक्का बसला होता. यानंतर आता भाजपविरोधात व कृषी कायद्यांविरोधात लढण्यासाठी अकाली दल शिवसेनेची मदत घेत आहे. यासाठीच अकाली दलाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser