आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅमेरात कैद:मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये चढताना पडली महिला, RPF जवानाच्या सतर्कतेने वाचले प्राण; रेल्वेमंत्री म्हणाले - असा निष्काळजीपणा करु नका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे मंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले - असा निष्काळजीपणा करु नका

मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एक महिला प्रवाश्याचा निष्काळजीपणा दाखवणाचा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एका महिलेचा तोल जाऊन ट्रेनला टक्कर घेऊन महिला प्लॅटफॉर्मवर पडून बेशुद्ध झाली. ही महिला ट्रेनखाली चिरडण्यापुर्वीच सतर्कता दाखवत ड्यूटीवर तैनात असलेल्या एका आरपीएफ जवान सुभाष भोसले यांनी महिलेला बाजुला ओढले. अशाप्रकारे महिलेचे प्राण वाचले. ही घटना 28 अक्टोबरला दुपारी 12 वाजेदरम्यानची आहे.

रेल्वे मंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले - असा निष्काळजीपणा करु नका
या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर शेअर करुन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सतर्कतेने प्रवास करण्यास सांगितले आहे. रेल्वेमंत्र्यानी ट्विटरवर लिहिले की, 'RPF सुरक्षारक्षाच्या सतर्कतेने घाटकोपर, मुंबईमध्ये एका महिलेचे प्राण वाचवले. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नामुळे जीवनाला गंभीर धोका उत्पन्न झाला होता. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत अशा प्रकारचा निष्काळजीपणा करु नका, हे आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.'

रेल्वे मंत्र्यांचे ट्विट...