आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय सिनेमाच्या इतिहासात २०२२ ब्लॉकबस्टर सिक्वेलचे वर्ष म्हटले तर वावगे ठरू नये. टॉलीवूड, बॉलीवूड, हॉलीवूडच्या सर्व सिक्वेलची बॉक्स ऑफिसवर धूम पाहायला मिळाली. टॉलीवूडचा केजीएफ-२ ने १२५० कोटी, बॉलीवूडचा दृश्यम-२ ने ३१० कोटी, भूलभुलय्या-२ ने २६६ कोटींची तगडी कमाई केली. याचा अर्थ केवळ तीन सिक्वेलने १ हजार ८२६ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. १६ डिसेंबरला झळकलेला हॉलीवूडचा अवतार-२चे ओपनिंग डे कलेक्शन ४१ कोटी होते. अॅव्हेंजर्स एंडगेम (५३ कोटी रुपये) नंतरचा हा आेपनिंगला सर्वात जास्त कमाईचा हॉलीवूडपट ठरला आहे.
३ तास १२ मिनिटांचा अवतार-2 यंदाचा सर्वात प्रदीर्घ चित्रपट
चित्रपट अवधी
अवतार-2 192 मि.
बेबीलोन 188 मि.
आरआरआर 187 मि.
धर्मवीर 180 मि.
वलीमाई 179 मि.
झुंड 176 मि.
बॅटमॅन 176 मि.
वर्षातील सर्वाधिक कमाईच्या टॉप-१० चित्रपटांत ३ सिक्वेल
चित्रपट कमाई (कोटीत)
केजीएफ-2 1250
आरआरआर 1200
पीएस-1 496
विक्रम 420
ब्रह्मास्त्र-1 431
कांतारा 397
कश्मीर फाइल्स 341
दृश्यम-2 310
भुलभुलैया-2 266
सरकारू वारी... 180
अवतार-२ ची ५.५ लाख तिकिटे अॅडव्हान्स विकली गेली होती; १३ वर्षांनंतर आलेल्या सिक्वेल अवतार-२ ची अॅडव्हान्स बुकिंग २१ कोटींची होती. ती नो वे होम (२२ कोटी) नंतर यंदा जास्त राहिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.