आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैत्रीला काळीमा:मुंबईमध्ये केवळ 400 रुपयांसाठी तरुणाने केली आपल्या मित्राची हत्या, पोलिसांनी केली अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फहीम आणि सोनू दोघेही एका जीन्स कंपनीमध्ये काम करायचे

उल्हासनगरमध्ये केवळ 400 रुपयांसाठी एका व्यक्तीने आपला मित्राची मारहाण करुन हत्या केली. त्याने आपल्या मित्राचे डोके खंब्यावर आदळले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही घटना उल्हासनगर पोलिस लाइन पोलिस स्टेशन परिसरातील आहे. आरोपीचे नाव सोनू गुप्ता असल्याची माहिती आहे. त्याच्यावर फहीम शेख नावाच्या तरुणाची हत्या करण्याचा आरोप आहे. फहीम आणि सोनू दोघेही एका जीन्स कंपनीमध्ये काम करायचे. काही महिन्यांपूर्वी फहीमने सोनूकडून 400 रुपये उधार घेतले होते. सोनू पैसे परत मागत होता आणि पगार मिळाल्यावर पैसे परत देतो असे म्हणत फहीम त्याला टाळत होता.

मारहाणीदरम्यान खंब्यावर आदळले डोके
उल्हासनगर हिल लाइन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत यांनी सांगितले की, मंगळवारी पुन्हा दोघांची भेट झाली आणि दोघांमध्ये 400 रुपयांसाठी वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आणि यानंतर सोनूने फहीमचे डोके खंब्यावर आदळले. जखम झाल्याने फहीम एका सेकंदासाठी उभा राहिला आणि अचानक बेशुद्ध झाला. फहीमला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात कलम 302 (हत्या) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी सोनूला अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...