आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Aaditya Thackeray Worli Constituency Mumbai | Inauguration Of Yuva Warrior Branch By Bjp Yuva Morcha President Mp Tejasvi Surya In Balekilla Of Aditya Thackeray

आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन:वरळी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष

विनोद यादवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपने वरळी मतदारसंघात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यासाठीच आता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते तेथे युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. युवा योद्धा शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, राज्य युवा मोर्चा प्रभारी गौरव गौतम, महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा अध्यक्ष राहुल लोणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तेजस्वी सूर्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार वसुलीचे काम करत होते. मागील सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारला त्यांनी कार्यक्षम आणि विकसनशील सरकार म्हटले आहे.

लोकांच्या पाठिंब्याने सत्ता येते

उद्धव ठाकरेंची शिवसेना हा सत्तेचा लोभी आणि कुटुंबाभिमुख पक्ष आहे जो हवामानाप्रमाणे आपली विचारधारा बदलतो. असा जोरदार हल्ला तेजस्वी सूर्याने उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या तरुणांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आगामी मुंबई महापालिका निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, या निवडणुकीत तरुण प्रभावीपणे काम करतील. सत्ता कुठल्या एका कुटुंबाचा हक्क असू शकत नाही. लोकांच्या पाठिंब्याने सत्ता येते, पैशांच्या पाठिंब्याने नाही, असे तेजस्वी सूर्या म्हणाले.

तरुण नेतृत्व

तेजस्वी सूर्या हे मतदारसंघातून भाजपतर्फ17व्या लोकसभेवर निवडून गेले. सूर्या हे बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. विशेष म्हणजे ते भाजपचे सर्वात तरुण खासदार आहेत. 2020 मध्ये त्यांना युवा मोर्चाचे प्रमुख बनवण्यात आले. त्याच वेळी, 32 वर्षीय ठाकरे यांनी 2019 मध्ये वरळीतून राजकीय इनिंगला सुरुवात केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती होते.

वरळी दक्षिण मुंबईतील मतदारसंघ असून हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. वरळीमध्ये उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, कामगार वर्ग मोठया संख्येने आहे. वरळी म्हणजे बीडीडी चाळी. निम्नवर्गीय मराठी माणसांची वस्ती. दलितांचा बालेकिल्ला. आज वरळी चर्चेत आली ती आदित्य यांचा मतदारसंघ म्हणून.

बातम्या आणखी आहेत...