आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या छत्तीसगडच्या पोलिसाचा आंबोली घाटात कोसळून मृत्यू झाला आहे.
मीतिलेस पॅकरा असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या या पोलिसाचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.
नक्की काय झाले?
छत्तीसगडवरून कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी हे पोलीस कर्नाटक रायबाग या ठिकाणी आले होते. काही दिवस सुट्टी मिळाल्याने पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले असताना हा अपघात झाला.
गोव्याहून पर्यटनाला जात असताना पोलिस लघुशंकेसाठी अंबोली घाटातील धबधब्याजवळ उतरले. त्यातील मीतिलेस पॅकरा हा दरीच्या दिशेने गेला. परंतू तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास 300 फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या अंधारात नेमके काय घडले हे त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनाही कळले नाही.
घटनेची माहिती मिळताच अंबोली पोलिस आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत संबंधित पोलिसाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. रेस्क्यू टीम पोहोचली तेंव्हा मीतिलेस शुद्धीत होते. मात्र, काही वेळातच त्यांनी प्राण सोडले. त्यानंतर आंबोली घाटातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.