आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय:अखेर परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांचीच वर्णी, पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले नवाब मलिक?

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी परभणीच्या जिल्हाधिकारी पदी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती केली होती. परंतु, गोयल यांना पदभार स्वीकारण्यापूर्वीच परत परतावे लागले होते. यामागे शिवसेना खासदार संजय जाधव यांचा हात असल्याची चर्चा सुरु होती. यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला मोठे उधाण आले होते. या प्रकरणामुळे प्रशासकीय बदल्यामागे राजकीय हस्तपेक्ष किती मोठा असतो हे उघड झाले होते. परंतु, या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असून परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयलच राहणार आहे. अशी माहिती पालकमंत्री नबाब मलिक यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर काय म्हणाले नवाब मलिक?
आंचल गोयल यांच्या बदलीबाबत 21 मार्चला आदेश निर्गमित करण्यात आले असून रुजू होण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. दरम्यान, त्यांच्या बदलीमागे काही लोकप्रतिनिधींना आक्षेप होता. त्यामुळे त्यांची बदली न करता गोयल यांना तात्पुरता थांबवण्यात आले होते. मी या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून गोयल यांना पदभार सोपवला पाहिजे असे म्हटलो. त्यांनी याला होकार दिला असे ते म्हणाले आहेत.

यापूर्वी काय म्हणाले होते मलिक?
पालकमंत्री नवाब मलिक यांनी काल या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितून होतात. हा जीएडी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असून याचे सर्व अधिकारी मुख्यमंत्र्यांना असतात. आंचल गोयल रुजू होण्यापूर्वी माझ्याशी बोलूनच परभणीमध्ये गेल्या होत्या. परंतु, त्या का परतल्या याबद्दल मला माहित नसल्याचे त्यांनी काल सांगितले होते. काही अज्ञानी आणि लोक माझ्यावर आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्या दिवशी नेमकं काय घडले?
राज्य सरकारने परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती केली. गोयल यांना तसे रुजू होण्याचे आदेशदेखील देण्यात आले होते. परंतु, रुजू होण्याच्या दिवशी हा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी काढले होते. यामुळे त्यांना परत परतावे लागले होते. या बदलीमागे परभणी जिल्ह्यातील काही नेते असल्याचे सांगितले जात होते.

बातम्या आणखी आहेत...