आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही वज्रमूठ?:मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे; आशिष शेलारांची 'मविआ'च्या सभेवरून जोरदार टोलेबाजी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज महाराष्ट्र दिनी मुंबईत होत आहे. मुंबईतील वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारी सभा ही अतिभव्य आणि रेकॉर्डब्रेक ठरणार, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. मात्र भाजपने या सभेच्या मैैदानावरुन महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी 'मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे', असे म्हणत मविआवर हल्लाबोल चढवला आहे.

देशाच्या संविधानाचे रक्षण, हुकूमशाहीचा तीव्र विरोध आणि राज्यातील घटनाबाह्य खोके सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होत आहे, असे मविआच्या नेत्यांनी सांगितले आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे मविआची वज्रमूठ सभा झाली होती. मात्र मुंबईत ज्या मैदानावर महाविकास आघााडीची ही सभा होत आहे. त्या मैदानावरुन भाजपने 'मविआ'ला टार्गेट केले आहे.

छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत वज्रमूठ सभेवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडते, एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होत आहे. ही वज्रमुठ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

उबाठाचा प्रवास...

आशिष शेलार पुढे म्हणाले, मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे. शिवाजी पार्क सोडले, बीकेसीतील मोठी मैदाने घेणे आता टाळले... 'उबाठाचा प्रवास ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे' असल्याने भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असे वाटतेय, असे म्हणत त्यांनी मविआवर तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात गद्दारीला स्थान नाही

बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभेसाठी विराट संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन महाविकास आघाडीने मुंबईकरांना केले आहे. उद्धव ठाकरे या सभेत काय बोलणार?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हजर राहतील. सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार सहभागी होणार किंवा कसे याबाबत संभ्रम आहे.

संबंधित वृत्त

महाराष्ट्रदिनी हल्लाबोल:महाविकास आघाडीची आज तिसरी ‘वज्रमूठ’ सभा; उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांची होणार भाषणे

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज महाराष्ट्र दिनी मुंबईत होत आहे. मुंबईतील वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारी सभा ही अतिभव्य आणि रेकॉर्डब्रेक ठरणार, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. सायंकाळी 5 वाजता ही सभा होत असून यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोध पक्षनेते अजित पवार यांची भाषणे होणार आहेत. वाचा सविस्तर