आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Abandon The House In The Name Of Hindutva, Run The Shiv Sena In The Name Of Maharaj, Get The Shivaji Park Seat, What Is Thackeray's Position? Rane's Attack

राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात:म्हणाले- हिंदुत्वाच्या नावावर घर, महाराजांच्या नावे शिवसेना चालवली; शिवाजी पार्कची जागा मिळवली

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बापाचे ध्येय, धोरण न पाळू शकणाऱ्या मुलाची दशा पाहवत नाही. उद्धव ठाकरे स्वार्थी आहेत. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात ते तीनच तास बसले. हिंदुत्वासाठी त्यांनी कोणताही त्याग केला नाही. उलट हिंदुत्वाच्या नावावर घर चालवले. ठाकरेंनी महाराजांच्या नावाने शिवसेना चालवली. शिवाजी पार्कची जागा ठाकरे कुटुंबाने मिळवली. पुतळे उभारले. त्यांनी काय केले सांगा? त्यांची औकात काय? असा सवाल करीत उद्धव ठाकरेंवर केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणेंनी जोरदार हल्ला चढवला.

मुंबईतील नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटप्रमुखांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती मेळावा झाला. त्यावेळी ठाकरेंचे घणाघाती भाषण झाले. या भाषणाला प्रत्युत्तर म्हणून राणे यांनी ठाकरेंवर पत्रकार परिषद घेऊन आज जहाल टीका केली.

ठाकरेंवर अशाीही वेळ

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काल गोरेगाव येथे गटप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यामुळे मी त्यांना उत्तर म्हणून पत्रकार परिषद घेत आहे. ठाकरे आता गटप्रमुखांवर येऊन पोहचले आहेत. आधी खासदार, आमदारांची बैठक, मेळावा घेतला. आता ते गटप्रमुखांचा मेळावा घेताना थेट केंद्र सरकारविरुद्ध बोलले. एकंदरीत त्यांचे भाषण निराशेच्या भावनेतील होते.

ठाकरेंना झोंबायचे कारण काय?

राणे म्हणाले, स्टेजवर एक खुर्ची खाली होती. संजय राऊत नाव होते. जेलमध्ये असताना खुर्ची ठेवली. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा दौरा मुंबईत झाला. उद्धव ठाकरेंना झोंबायचे कारण काय? उद्धव ठाकरेंना चागंल्या शब्दात बोलता येत नाही का?

ठाकरेंचे योगदान काय?

राणे म्हणाले, ठाकरे म्हणतात, अमित शहा म्हणाले यांना जमीन दाखवा, ठाकरे म्हणाले आम्ही अस्मान दाखवू शहा काय म्हणाले हेच ठाकरेंना कळाले नाही. अस्मान कुणाच्या जीवावर दाखवणार. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा उद्धव ठाकरे सहा वर्षांचे होते. त्यांनी मराठी माणसांचे आंदोलनात ते नव्हते. १९९९ नंतरच ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यापूर्वी शिवसैनिकांनी हाल सोसले, संघर्ष केला तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते.

दूध फुकट पाजले नाही

राणे म्हणाले, काही न करता सरळ मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे समोर आले. ते म्हणतात आम्ही दूध पाजले आणि आमच्याशी गद्दारी केली. ठाकरेंनी सत्तेचे दूध पाजले. तेही फुकट पाजले नाही. यात शिवसैनिकांचा त्याग आहे. त्यात मेहनत आणि परिश्रम आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही. दुध पाजले म्हणता मग तूप कुणी खाल्ले

उद्धव ठाकरेंनी तूप खाल्ले

राणे म्हणाले, सत्तेचे दूध एकनाथ शिंदे पीत होते कारण त्यांनी त्याग केला. पण मेवा आणि तूप उद्धव ठाकरेंनी खाल्ले. अडीच वर्षांत सत्तेत असताना किती गटनेत्यांना भेटले. किती शिवसैनिकांना नोकरी दिली. ठाकरेंनी काही दिली. गट नेत्यांबद्दल आस्था आणि प्रेम नाही. आता अस्मान दाखवण्याची भाषा करीत आहेत.

ठाकरेंचा अरे-तूरेवर उल्लेख

राणे म्हणाले, ठाकरेंची औकात आहे का? पिंजऱ्यात असताना संजय राऊतांची खुर्ची ठेवतात. मंत्रालयात केवळ तीन तास बसले. हिंदुत्वासाठी कोणता त्याग केला. उलट हिंदुत्वाच्या नावावर घर चालवले. कशाला इतिहास सांगता. महाराजांच्या नावाने शिवसेना चालवली. अडीच वर्षे काय केले. हयातीत महाराजांसाठी काय केले. शिवाजी पार्कची जागा ठाकरे कुटुंबाने जागा मिळवली. पुतळे उभारले. उद्धव ठाकरेंनी काय केले सांगा?

उद्धव ठाकरे स्वार्थी

राणे म्हणाले, बाळासाहेब आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत झगडले आणि उद्धव ठाकरे सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले. ते स्वार्थी आहेत. मुंबईवर गिधाडे फिरत आहेत असे ठाकरे म्हणाले. तेच लोक देशाचे संरक्षण करीत आहेत अशी उपमा देताना काही वाटायला हवे. दुसऱ्यांची चेष्टा, मस्करी करणे, खोटे बोलणे किती चुकीचे आहे.

महाराष्ट्राला काळीमा फासला

राणे म्हणाले, मला मंत्रिपद मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शहांना फोन करीत होते. उद्धव ठाकरे खोटारडे आहेत. त्यांनी काहीही केले नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहीले हा महाराष्ट्रासाठी काळीमा आहे.

बातम्या आणखी आहेत...