आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजीत बिचकुले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार:म्हणाला- 100 आमदार, 100 खासदारांची गरज; मी राज्याबाहेरील आमदारांच्याही संपर्कात

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती पदासाठी केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधकांत गोळाबेरीज सुरु असतानाच आता निरनिराळ्या निवडणुकीत नशीब आजमावणारे बिग बाॅस फेम अभिजित बिचकुले यांनाही राष्ट्रपती पदाचे डोहाळे लागले आहेत. ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले.

मी लोकप्रतिनिधींच्या संपर्कात

राष्ट्रपती निवडणूकीसाठी शंभर आमदार आणि शंभर खासदारांची मला गरज असून महाराष्ट्राबाहेरील लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.

आपल्या ना-ना तऱ्हांनी चर्चेत असलेला चेहरा म्हणजे अभिजित बिचकुले..त्याने अनेक निवडणूकीत नशीब आजमावले; पण यशाने अद्यापही गवसणी त्याला घातलीच नाही. यापुर्वी मोठ्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर बिग बाॅस मराठी मध्ये त्याची एंट्री झाली अन् ती चर्चेतही आली होती. त्यानंतर आता तो राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.

मविआ-भाजपच्या आमदारांचा पाठींबा!

अभिजित बिचकुले माध्यमांशी बोलताना म्हणाला की, मविआ आणि भाजपच्या काही आमदारांचा राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा मला आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या काही आमदार- खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात आहे. तसेच त्यांच्या पाठिंब्यासाठी गाठी भेटी घेत असल्याचे बिचुकलेंनी सांगितले आहे.

काय म्हणाले अभिजीत बिचकुले?

दोन दिवसांपुर्वी निवडणूक जाहीर झाली, त्यानंतर निकटवर्ती आमदारांशी मी चर्चा करीत होतो, त्यांच्यामार्फत अभिजित बिचकुले ​​​​​शंभर आमदार आणि शंभर खासदार आपल्याला तिकडे लागणार आहे. मला किती यश येईल हे माहित नाही, काही पक्ष व्हिप काढतील तरीही मी प्रयत्नशिल आहे, महाराष्ट्राबाहेरील खासदार, आमदारांनाही संपर्क करीत आहे. मी पुर्ण निर्व्यसनी माणूस आहे, मी वकीलीचे शिक्षण घेतले पण केला पण नंतर सोडून दिला असा माणूस जर राष्ट्रपती झाला तर काय वाईट. अब्दूल कलामही राष्ट्रपती झाले पण सर्वजण माझ्या म्हातारपणाची वाट बघणार का असेही बिचकुले म्हणाले.

राष्ट्रपतींनी यातही लक्ष घालावे

कायदा आणि सुव्यवस्था महत्वाची कुठेही जाती-पाती नको, मी पुण्यात राहतो तिथे छोटी मुलं फुगे विकतात, टिकल्या विकतात त्यांना शिक्षणाची गरज आहे या मुद्द्यावर लक्ष घालायला हवे असेही अभिजित बिचकुले म्हणाले. राष्ट्रपती पदासाठी 100 आमदार आणि तितकेच खासदार आपल्याला लागतील, राज्याबाहेरील लोकप्रतिनिधींच्याही मी संपर्कात असा दावा अभिजित बिचकुले यांनी केला आहे.

तेव्हा पंतप्रधानांनी मला संधी दिली नाही

बिचकुले म्हणाले की, ''मी बहुजन समाजातील आहे, अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती मला आहे. हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. परंतु त्यावेळी त्यांनी कोणीतरी ;कोविंदसाहेब शोधून आणले आणि त्यांना देशाचे राष्ट्रपतीपद दिले. त्यांना बहुमतामुळे ते जमले.''

बातम्या आणखी आहेत...