आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Shivsena Important Meeting Shivsena Bhavan Mumbai | Absence Of Chief Minister Uddhav Thackeray At The Meeting; Aditya Thackeray Will Guide

शिवसेना भवनात जोरबैठका:स्थानिक पातळीवर एकसंघासाठी जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक; व्हिसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी केले मार्गदर्शन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने राज्यात प्रमुख नेत्यांचे बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका प्रमुखांना आज बैठकीसाठी मुंबईत बोलवण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिसीद्वारे या बैठकीला संबोधित केले आहे. तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी देखील या बैठकीचे नेतृत्व केले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी सेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. विशेष म्हणून या बंडखोरीने शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी आता स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सेनेभवनात आज शिवसेनेच्या खासदारांची, जिल्हाप्रमुख्यांची तसेत संपर्क प्रमुखांची बैठक होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व खासदार, जिल्हाप्रमुख, शाखा संपर्क प्रमुखांची दुपारी एक वाजता बैठक बोलावली होती. यात शिवसेनेची पुढची रणनीती बाबत चर्चा होणार आहे.