आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या 9 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे (Mumbai Local) दार बंदच आहे. पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वे मार्गावर आजपासून एसी लोकल (Ac Local) सुरू झाली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी एसी लोकल मध्य रेल्वे ठाणे-वासी / पनवेल हार्बर मार्गावर जात होती. लॉकडाऊन उठवल्यानंतर जूनमध्ये लोकल सुरू करण्यात आली. मात्र सध्या केवळ अनिवार्य आणि आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि शासकीय अधिकृत प्रवासी लोकलमध्ये प्रवास करू शकतात.
सकाळी 5.42 ते रात्री 11.25 दरम्यान चालणार ट्रेन्स
दरम्यान या 10 एसी लोकल सेवांमध्ये दोन गाड्या सीएसएमटी (मुंबई) आणि कल्याण दरम्यान, चार रेल्वेंचे सीएसएमटी आणि डोंबिवली आणि इतर चार रेल्वेंचे परिचलन सीएसएमटी आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान होणार असल्याचे माहिती मध्य रेल्वेने बुधवारी दिली. मुख्य लाइनवर पहिली एसी लोकल सेवा सकाळी 5 वाजून 42 मिनिटांनी कुर्लावरून सीएसएमटीकडे रवाना होईल. तर अखेरची लोकल सीएसएमटीहून कुर्लाकडे रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी रवाना होईल.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, फक्त रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांनी मंजूर केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल. तथापि, पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेसह मुंबईत 89 टक्के उपनगरी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे.
रविवारी एसी लोकल गाड्या धावणार नाहीत
ही रेल्वे सेवा रविवारी बंद ठेवली जाईल आणि कार्यालयीन दिवसांत म्हणजेच सोमवार ते शनिवार चालू असेल. या लोकल गाड्या सर्व विद्यमान स्थानकांवर थांबतील. रेल्वेने प्रवाशांना कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
नवीन AC लोकलचे वेळापत्रक
कुर्लाहून सकाळी 5:42 वाजता निघालेली ट्रेन सकाळी 6:12 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
सीएसएमटीहून सकाळी 6: 23 वाजता निघालेली ट्रेन 7:40 वाजता डोंबिवलीला पोहोचेल.
डोंबिवलीहून सकाळी 7:47 वाजता निघून सीएसएमटीला 9:08 वाजता पोहोचेल.
सीएसएमटीहून सकाळी 9:12 निघेल आणि 9:40 वाजता कुर्ल्याला पोहोचेल.
संध्याकाळी 4:36 वाजता कुर्ल्याहून निघून 5:08 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
संध्याकाळी 5:12 वाजता सीएसएमटीहून निघून 6:42 वाजता कल्याणला पोहोचेल.
संध्याकाळी 6:51 वाजता कल्याणहून निघून रात्री 8:18 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
रात्री 8:22 वाजता सीएसएमटीहून निघून रात्री 9:40 वाजता डोंबिवलीला पोहोचेल.
रात्री 9:59 वाजता डोंबिवलीहून निघून रात्री 9:19 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
रात्री 9:25 वाजता सीएसएमटीहून निघून 9:53 वाजता कुर्ल्याला पोहोचेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.